Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

केतन वोरा : ‘लॉकडाऊन समन्वयक ‘ ; केतन वोरा मित्र परिवार बनला ‘कोरोना लॉकडाऊन’मध्ये लाखो वंचित, अनाथ,गरजूंचा ‘आधार’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 May 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोविड ही महामारी भारतात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली, देश आहे तिथे थांबला, परप्रांतीय, अडकलेले कामगार, रस्त्यावर राहणारे भिक्षेकरी, वंचित, गरजू ,गरीब, अनाथ यासह ज्यांचे हातावर पोट आहे अशांची मोठी अडचण झाली, खायचे काय असा प्रश्न प्रत्येकाच्या समोर होता, 

राजकीय पक्ष , संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्ती अशावेळी धावून आले प्रत्येकाने आपापल्या परीने धान्य देऊन मदत केली, काहींनी दिखावा करत प्रसिद्धीची स्टंटबाजी केली, परन्तु या लॉकडाऊनमध्ये सर्वात लक्षात राहिलेला ग्रुप म्हणजे केतन वोरा मित्र परिवार. या मित्र परिवारात कुशाल देढीया, धिरेन गडा, कल्पेश जव्हेरी, राजू वोरा,  यांचा समावेश आहे, यांना उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान यांची मोलाची साथ लाभली आहे, आणि त्यामध्ये स्वतः केतन वोरा यांचा सर्वत्र पुढाकार होता, हा परिवार प्रिसीजन उदयोग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.

कोरोनाच्या या महामारीत केतन वोरा हे “लॉकडाऊन समन्वयक” ठरले आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले, सुरुवातीला जिल्हा प्रशासनाला 10 हजार धान्य किट दिले, 1 ट्रक पार्ले बिस्कीट दिले,  एन 95 मास्क असतील, हॅन्ड सॅनिटायझर्स वाटप केले, तसेच ,  रुग्णसेवेचे काम करणाऱ्याना पीपीई किट दिले, महापालिकेला swab टेस्ट किट दिले, रेल्वेला हॅन्डग्लोज व शिल्ड पुरवले, आतापर्यंत सव्वा वर्ष अर्थात तब्बल 425 दिवसात लाखो गरजू, अनाथ, रस्त्यावर राहणाऱ्याना भोजन सेवा पुरवली, या सेवेत आस्था रोटी बँक, प्रार्थना फाउंडेशन, सुहास कदम, संभव फाउंडेशन, आनंद गोसकी यांची मदत घेतली,

कोरोना लॉकडाऊनमध्ये सोलापूरात अडकलेले पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश तामिळनाडू या भागातील नागरिकांना परत आपल्या राज्यात जाण्यासाठी सरकारने रेल्वेची सुविधा उपलब्ध केली, प्रवास हा दोन दिवसांचा तसेच त्यापेक्षा कमी आणि जास्त वेळेचा  असल्याने आणि रेल्वे कुठे ही थांबत नसल्याचा विचार करून केतन वोरा यांनी या प्रवाशांना पार्सल स्वरूपात जेवण पुरवले, प्रिसीजन उद्योग समूह, लक्ष्मी हायड्रोलिक्स, यासह क्रॉस इंटरनॅशनल यांनी जेवण पूरवले, ते जेवण बनवण्याचे काम उदयोगवर्धिनीच्या चंद्रिका चौहान यांच्या टीमने  केले.

मध्यंतरी कोविडचा संसर्ग कमी झाला तेव्हा गरजूंना आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे व सुहास छंचुरे तसेच रॉबिनहुड आर्मीचे हिंदुराव गोरे यांच्या टीम मार्फत भोजन देण्याची सेवा अविरत चालू ठेवली , कोरोनाची दुसरी लाट आली, महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन झाले, पुन्हा रुग्ण वाढले त्यात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईक असे दररोज 200 जणांना केतन वोरा मित्र परिवार भोजन पुरवत आहे, 

जोपर्यंत लॉकडाऊन राहणार तोपर्यंत ही सेवा सुरूच राहील असे केतन वोरा यांनी सांगितले आहे. कोरोना या महामारीत प्रशासन असेल, उद्योजक असतील, संस्था असतील, संघटना असेल तसेच गरजू नागरिक असतील यांच्यातील केतन वोरा यांनी समन्वयकाचे काम केले आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानाने वोरा यांना गौरविण्यात आले .लॉकडाऊन मधील लाखो वंचित, अनाथ,गरजूंचा ते  ‘आधार’ बनले हे मात्र निश्चित.

SendShareTweetSend
Previous Post

“नव्या नवरीचे, नऊ दिवस ” महापालिका आयुक्तांच्या कोविड काळातील कारभारावर शहरातून टीका

Next Post

गुड न्यूज ! उळे ग्रामस्थाने बनवलेल्या शॉर्ट फिल्मची आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

गुड न्यूज ! उळे ग्रामस्थाने बनवलेल्या शॉर्ट फिल्मची आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत निवड

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group