महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड यांच्या वतीने कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्यासाठी जनसेवा अभियानाची सुरवात (दि.26) माजी आमदार विश्वानाथ चाकोते यांच्या हस्ते करण्यात आली,
कोविड कालावधी मध्ये गेल्या वर्षभरापासून काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड च्या वतीने हे मदत कार्य सुरु आहे. सदर हाती घेतलेला उपक्रम कोरोना आटोक्यात येईपर्यंत चालू राहणार असून
चारचाकी वाहनाद्वारे गावोगावी जाऊन गरजू लोकांना जेवण, अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच लसीकरणाची मोफत नोंदणी,कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर फवारणी करण्यात येणार आहे यावेळी लोकांना वारंवार हात धुणे, मास्कचा नियमित वापर,सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आवश्यक ते नुसार तालुकानिहाय चारचाकी वाहनाची संख्या वाढवून लोकांना त्वरित मदत मिळवून देणार असल्याचे अभियानाचे आयोजक सुदिप चाकोते यांनी सांगितले.
या अभियानाच्या उदघाटन प्रसंगी सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक सिद्धराम चाकोते,सक्लेश चाकोते, प्रसिद्ध व्यापारी सुखलाल मढेकर, प्रसिद्ध नृत्य शिक्षक बोबडे , सोमशेखर चाकोते, शेखर पाटील, कल्याणराव चौधरी, नितीन हसलगी, महेश दिंडे, शिवाजी लच्चन, राजा हिरेमठ, विकास बनसोडे, अक्षय हलकट्टी, सागर हिरेमठ, नुरअहमद नालवार, श्रीकांत दासरी, अशोक नरहरी, रहीम नदाफ, अशोक कुंभार, विजय हसापुरे, अनिल दासरी, उमेश भगवंती आदी कार्यकर्ते उपस्थित होते




















