महाराष्ट्राचे आक्रमक, सडेतोड नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रात मोदी सरकारने मंत्रिपदाची शपथ दिली. भारतीय जनता पक्षाने एकूणच मराठा समाज, कोकण तसेच मुंबई आणि विशेष म्हणजे शिवसेनेची पाळेमुळे माहिती असलेले राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री केले आहे. त्यामुळे नारायण राणे समर्थकांमध्ये उत्साह जल्लोष आणि प्रचंड आनंदाचं वातावरण आहे,
राणे हे केंद्रात मंत्री झाल्याने सोलापुरात त्यांचे कट्टर आणि अत्यंत जवळचे समर्थक संतोष अण्णा पाटील ज्यांचं जिल्ह्यातील राजकीय वजन निश्चितच वाढणार आहे. नारायण राणे जिथे संतोष अण्णा तिथे असं काहीसं समीकरण राजकारणात दिसून आलं आहे . मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील संतोष पाटील यांची राणे समर्थक म्हणून जिल्हा आणि राज्यात ओळख आहे. नारायण राणे हे शिवसेनेत होते तेव्हा संतोष पाटील शिवसेनेचे, राणे काँग्रेसमध्ये आले, संतोष अण्णा-काँग्रेसमध्ये, राणे पुन्हा भाजपमध्ये अण्णाही भाजपमध्ये. राणे यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून अण्णांची ओळख आहे, राणे यांच्या शपथविधी वेळी संतोष पाटील हे दिल्लीत होते.
संतोष पाटील हे जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांनी जिल्ह्याच्या काँग्रेसची मरगळ घालून नवसंजीवनी आणून दिली होती, सोलापूर शहरातील काँग्रेस भवनांमध्ये जी हायटेक कार्यालये दिसतात ते केवळ संतोष पाटील यांच्यामुळेच.
संतोष पाटील जरी वादग्रस्त राहिले असले तरी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा कारकिर्दीत जिल्हा काँग्रेसचा आलेख हलता ठेवला होता. अनेक आंदोलने, निदर्शने, बैठका, उपक्रम, मेळावे त्यांनी घेतले, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामे त्यांनी केली. असे असतानाही काँग्रेसने या नेत्याला पदावरून काढले आणि जिल्ह्यात काँग्रेसची आज काय अवस्था झाली हे सर्वश्रुत आहे.
मागील पाच ते सहा वर्षात संतोष पाटील शांत होते, कोरोना काळात मात्र सोलापूर शहर जिल्ह्याची वाईट परिस्थिती पाहून अण्णांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना टार्गेट केले, लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा सोलापूर व माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानेच त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले म्हणून ही परिस्थिती उद्भवली असा सडेतोड आरोप करणारे संतोष पाटीलच होते, तेव्हाच शरद पवार यांनी सोलापूरात येऊन कोरोना बैठक घेतली हे विशेष होते.
राजकारणात प्रत्येकाची वेळ येते असे म्हणतात पाच वर्षे शांत राहिलेले संतोष पाटील यांची निश्चित वेळ आलीय. नरखेडच्या पाटलांचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वजन निश्चितच वाढणारी ही देशातील मोठी राजकिय घडामोडी आहे.




















