Thursday, October 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक पुसून काढणार ; भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पंढरपुरात संकल्प ; काय आहे दोघांकडे मास्टर प्लॅन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2024
in political
0
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या दुष्काळाचा कलंक पुसून काढणार ; भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पंढरपुरात संकल्प ; काय आहे दोघांकडे मास्टर प्लॅन

पंढरपूर : खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर केंद्र आणि राज्यशासनाच्या मदतीने उजनी धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेवून जिल्हयाच्या कानाकोपर्‍या पर्यंत उजनीचे मुबलक पाणी पोहोचविणे तसेच स्थानिक तरुणांना सोलापूरातच काम निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असून सोलापूर व माढा या दोन्ही मतदारसंघातून आम्हा भाजपाच्या दोन्ही उमेदवाराना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आमदार राम सातपुते यांनी पंढरपूरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केले.

शिवसेनेचे संंपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या पुढाकाराने माढा व सोलापूर मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आ.शहाजी पाटील होते. या प्रसंगी माढा लोकसभेचे उमदेवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळनर, प्रा.शिवाजी सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महावीर देशमुख, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, प्रा.बी.पी.रोंगे, शिवसेनेचे जिल्हयातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थित शिवसैनिकांनी माढयातून खा.रणजितसिंह निंबाळकर व सोलापूरातून आ.राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.

आ.राम सातपुते पुढे बोलताना म्हणाले, मी ऊस तोड कामगाराचा मुलगा असून दुष्काळ काय असतो ते मी अनुभवले आहे. सोलापूर जिल्हयाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी मी स्वत: खा.रणजितसिंह निंबाळकर, आ.शहाजी पाटील यांनी अथक प्रयत्न केले आहेत. दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळाले म्हणून खा.निंबाळकर यांची सांगोल्यात हत्ती वरुन मिरवणूक काढली होती. सोलापूर, पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्ते चकचकीत झाले असून आमच्या माय माऊलींच्या डोक्यावर असलेला पाण्याचा हंडा उतरविण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायती मध्ये जलजीवन मिशनद्वारे पिण्याचे शुध्द पाणी मिळालेले आहे. घरातील चुल काढण्यासाठी सोलापूर जिल्हयातील दोन लाख घरात उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडण्या दिल्या आहेत. ही निवडणुक सोलापूर जिल्ह्याचे व देशाचे भवितव्य ठरविणारी असल्याने मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सोबत रहा असे आवाहन केले.

प्रा.शिवाजी सावंत म्हणाले, शिवसेना व भाजपाच्या कार्यकत्यांनी एकत्रितपणे हातात हात घालून काम करणे गरजेचे असून भाजपाचे दोन्ही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार याबाबत मला कोणतीही शंका नाही परंतु, निवडून आल्यावर त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसैनिकांना जवळ घेवून त्यांचीही कामे करावीत अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

शरद पवारां मुळे पंढरपूर बारामती रेल्वे मार्ग रखडला : खा.रणजितसिहं निंबाळकर

माढा मतदारसंघातून निवडून गेलेल्या शरद पवारांनी या भागातील जनतेला फसवण्याचे काम केले, उजनीचे पाणी बारामतीला पळवले मी व आ.शहाजी पाटील यांनी ते पाणी पुन्हा जिल्हयाला मिळवून दिले. बारामती पंढरपूर रेल्वे मार्गास ही पवारांनी विरोध केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास विरोध केला त्यांमुळे या मार्गाचे काम रखडले.

Tags: Amol shindeMadha loksabhaMLA Ram satputeRanjitsinh Naik nimbalkarShivaji sawantSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल

Next Post

….तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
….तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

....तर माझा कान पकडा : आमदार प्रणिती शिंदे असे का म्हणाल्या ; मोहोळ तालुक्यात प्रचंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002143
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group