सोलापुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ ; माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंच्या वाढदिनी जुळला योग ; साहेबांना विश्वास चमत्कार घडेल
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ तुळजापूर वेस पूर्व मंगळवार पेठ येथील महेश कोठे यांच्या शहर उत्तर विधान सभा संपर्क कार्यालयात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे, काॅग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, सेनेचे गणेश वानकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर यू एन बेरिया, सेनेचे विष्णू कारमपुरी, अस्मिता गायकवाड, काॅग्रेसचे अशोक निंबर्गी, सेनेचे शरद कोळी, अजय दासरी, अमर पाटील, संभाजी शिंदे, काॅग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे नेते आयोजक महेश कोठे, सेनेचे माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
देशभरामध्ये भाजपा सरकारने राजकता माजवली आहे. म्हणूनच देशात इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडी चमत्कार घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करत माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील हा चमत्कार दिसेल असा विश्वास व्यक्त केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यापुढील काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे यांनी दिली.