सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भांगाची तक्रार
सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार तक्रारदार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता चालू असताना वाहनांवर व सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोलापूर शहरांमध्ये रिक्षांवर
वाहन क्रमांक MH13BV1628, MH 13G9680 या वाहनांवर निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेता प्रचाराचा बॅनर लावून त्यावर मोबाईल क्रमांक ७०६६६२४२२ असा क्रमांक टाकला आहे. व तो थेट आमदार प्रणिती शिंदे यांचा असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केला आहे. हे कॉलर आयडीद्वारे सिद्ध होत आहे अशी तक्रार तक्रारदार वैभव बिराजदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच सोलापूर शहरातील महापौर बंगला चौक, सात वाजता शासकीय विश्रामगृह कंपाऊंड, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल डफरीन चौक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा बॅनर निवडणूक आयोगाच्या परवानगीविना लावला आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आचारसंहिता चालू असतानाही आदेशाचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व सोलापूर सोशल फोरम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार वैभव बिराजदार यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.