हे तिघे कोण आहेत? ज्यांना सोलापूरच्या क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या
घरफोड्या करणाऱ्या तीन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना सोलापूरच्या शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांकडून मोटार सायकल चोरी आणि घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकास माहीती मिळाली की, संशयीत तीन इसम हे लाल काळ्या रंगाचे मोटार सायकलवर चोरी करण्याचे उद्देशाने कर्णिक नगर जवळ दबा धरून थांबलेले आहेत. त्याप्रमाणे सपोनि क्षिरसागर यांनी, बातमीचे ठिकाणी त्यांचे पथकासह तात्काळ जाऊन शिताफिने ०३ संशयीत इसम नामे ०१) राजासिंह आजादसिंह बडोले वय-२३ वर्ष, रा.घर नंबर ९८/१, मुक्काम उमरटी, पोस्ट- बडवाडी, वार्ड नंबर ०३, तालुका-वरला, जिल्हा बडवाडी, राज्य-मध्यप्रदेश, ०२) अवतारसिंह महुसिंह टाक वय-३१ वर्ष, रा. रा. मुक्काम उमरटी पोस्ट- बडवाडी, तालुका- वरला, जिल्हा- बडवानी, राज्य-मध्यप्रदेश व ०३) कुलदीपसिंग जोतसिंग बडोले ऊर्फ भोंड वय-२९ वर्ष, रा. मुक्काम- सोरापाडा, पोस्ट- अक्कलकुवा, तालुका अक्कलकुवा, जि. नंदुरबार राज्य-महाराष्ट्र यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांचेकडे सखोल तपास केला असता, नमूद इसम हे पहाटेचे वेळी एका चोरीचे मोटार सायकलवर ट्रिपल सिट जाऊन घरफोडी व चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांचेकडून, सोलापूर शहरातील खालील प्रमाणे ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरीचा गुन्हा असे एकुण ०३ गुन्हे उघडकीस येवून, त्यामध्ये, एकुण ५४,१०० रू किंमतीची मुद्देमाल व घरफोडी करण्यासाठी वापरलेली कटावणी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपीविरूध्द माहिती घेतली असता, ते आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार असून, त्यांचेविरूध्द दिल्ली व इतर राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. वर नमूद तिन्ही आरोपी हे, सोलापूर शहरात दिनांक १४/०९/२०२४ रोजी, चोरी करणेचे उद्देशाने आले होते. ते एका लॉजवर राहत होते. त्यामुळे, सर्व लॉज मालकांना पोलीसांचे वतीने आवाहन करणेत येत आहे की, असे कोणी संशयीत/अनोळखी इसम लॉजवर राहणेस आल्यास, त्याबद्दल सोलापूर शहर पोलीसांना माहिती द्यावी.