आधार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा ; पोलिसांनी केले कौतुक
सोलापूर : विजापूर रोड येथील शिवदारे कॉलेज समोरील आधार हॉस्पिटल चा कर्मचारी गुलाब मानसिंग चव्हाण (वय 30) साखर कारखाना येथे घरी जात असताना एका बॅगेते त्याना मोबाईल सापडला असून तो मोबाईल विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, हवालदार उदय साळुंखे यांच्याकडे आज सकाळी जमा करण्यात आले.
या प्रामाणिकपणा बद्दल पोलिस प्रशासनाने गुलाब चव्हाण यांचे कौतुक केले. सापडलेला मोबाईल हा संबंधित महिलेला परत देण्यात आला.
यावेळी शाम गायकवाड, युवराज राठोड, दिनेश राठोड, आदी उपस्थित होते.