सोलापूर : कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेच्यावतीने संघटनेच्या कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे कार्यकारी अभियंता बांधकाम संतोष कुलकर्णी व खराडे, समाजकल्याण अधिकारी खामितकर, खातेप्रमख प्रवीण पाटील, अमोल जाधव, मिरकले यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष क्षीरसागर होते. सरचिटणीस संजय कांबळे, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू, चंद्रकांत होळकर, नरसिंह गायकवाड, कल्याण श्रावस्ती, योगेश कटकधोंड, नागनाथ धोत्रे, BK चव्हाण, अविनाश गोडसे, अनिल जगताप, सूरज नदाफ, मकरंद बनसोडे, ज्ञानेश्वर व्हटकर श्रीमती रांजणे आदीसह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.