Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 July 2025
in crime
0
सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
2.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या पोलीस आयुक्तांचा मोठा दणका ; सालार गॅंगवर मोक्का अंतर्गत कारवाई

सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एक मोठी कारवाई करताना सोलापूर शहरात मागील अनेक वर्षापासून टोळीने गुन्हेगारी करणारे आणि दहशत माजवणाऱ्या सालार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने सोलापूर शहरातील गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दि.02/07/2025 रोजी, दुपारी 02.30 वा चे सुमारास, मौलाना आझाद चौक, नई जिदंगी, सोलापूर येथे, फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी, यातील आरोपींना दिलेले हात उसणे पैसे परत मागितले असता, त्या कारणावरून, यातील आरोपी नामे जाफर शेटे, टिपु सालार, फैसल सालार, पापड्या, अक्रम पैलवान व त्यांच्यासोबत असलेले इतर 3 ते 4 इसम यांनी, फिर्यादीस लाथाबुक्क्याने मारहाण केली.

तसेच, फैसल सालार याने, फिर्यादीस मे इधर का भाई हु.. कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा..” असे म्हणुन, चाकूच्या सहाय्याने धमकावले. तसेच, नमूद आरोपींनी, त्याठिकाणी दहशत निर्माण केल्याने, तेथे जमलेले लोक घाबरून पळु लागले. त्यावेळी, तेथील, दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून घेतली. तसेच तेथे राहणारे रहिवासी यांनी देखील आप-आपली घरे बंद करून घेतली. त्यानंतर, फैसल सालार याने, त्याच्या हातातील चाकुने फिर्यादीच्या पोटात खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना, फिर्यादीने त्यांचा डावा हात त्याच्या आडया घातला. त्यामुळे, त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने ते खाली पडले. त्यावेळी, वरील सर्व इसम हे तेथुन पळुन गेले.

याबाबत, फिर्यादीने 1) फैसल सालार रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर, 2) जाफर शेटे रा. पेंटर चौक, सोलापूर, 3) टिपु सालार रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर, 4) पापड्या (अॅम्ब्युलन्स चालक) रा. पत्ता माहित नाही, 5) अक्रम पैलवान रा. विजापूर वेस, मुल्लाबाबा टेकडी सोलापूर व त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 इसम यांच्याविरूध्द दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 109,189 (1), 189 (2), 189(4),191(1), 191(2),191(3),190,351(2) (3).49 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135,142 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या तपासात, गुन्ह्यातील, निष्पन्न आरोपी (1) फैसल अब्दुल रहीम सालार, (2) जाफर महम्मद युसुफ शेटे, (3) सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, (4) अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, (5) अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड व (6) वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांनी, मागील 10 वर्षात (सन-2015 ते सन-2025 या कालावधीत), संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्याने, स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी, तसेच परीसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी, हिंसाचाराचा (बळजोरी-Violence) चा वापर करुन, 03 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे 07 दखलपात्र गुन्हे केले असून, सदर गुन्ह्यातील नमुद आरोपी हे, एकाच टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळेपोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिनांक 21/07/2025 रोजी, सालार टोळीविरूध्द, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) हे कलम समावेश करण्यास पूर्व परवानगी दिलेली आहे. त्यानुसार, सदर गुन्ह्यामध्ये, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1) (ii), 3(2),3(4) या कलमांची (मोक्का कायदयाची) वाढ करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास राजन माने सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) सोलापूर शहर हे करीत आहेत.

Tags: CP m rajkumarMocca
SendShareTweetSend
Previous Post

बापरे ! सोलापूर जिल्ह्यात पुन्हा या रोगाचा शिरकाव ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

Next Post

किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा – संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा – संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम

किसनभाऊंच्या वाढदिवसाला उमेशदादा - संतोषभाऊ एका स्टेजवर ; देवेंद्रांच्या उपस्थितीत रंगला कार्यक्रम

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999367
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group