सोलापूर महापालिका आयुक्तांनी घेतला पुढाकार अन् सरसावले उद्योजक, पर्यावरण प्रेमी
सोलापूर : सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ३३% हरित क्षेत्र निर्मिती करणेकामी मा. आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षते खाली शहरातील उद्योजक, पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिक यांचे समवेत दि.०३/०३/२०२५ रोजी इंद्रभुवन इमारती मधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली होती.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमुर मुलाणी, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त (पर्यावरण विभाग) शशिकांत भोसले, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, चेबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी,धवल शहा, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गडडम, अंबादास बिंगी, पंकज चींदरकर, नरेंद्र गायकवाड, अनिल जोशी, डॉ.मनोज देवकर, नारायण पाटील, बँक ऑफ बडोदाचे अमित चौधरी, पवन देसाई, अभिषक बदलापुरे, विजय जाधव भारत पाटील सह सामाजिक संघटना, वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी, उद्योजक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व उपस्थितांचे स्वागत करून हरित सोलापूर चर्चा सत्राच्या’ आयोजनाची सविस्तर माहिती दिली. तदनंतर उपस्थित सर्व उद्योजक, पर्यावरण प्रेमी संस्था व नागरिक यांनी आपली ओळख करून देऊन शहरातील दुभाजक, रोडच्या दोन्ही बाजु व ओपन स्पेसच्या ठिकाणी पुढील तीन वर्षात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित करणेकामी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
यावेळी आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी शहरातील उद्योजक,पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, वृक्ष संघटना,सामान्य नागरिक यांचीशी सावंद साधताना म्हणाले की सोलापूर शहर हरीत व सुंदर करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे.बांधकाम परवानगी देताना ग्रीन बिल्डींग प्रकल्पास चालना देणेकामी स्वतंत्र धोरण नेमण्यात येईल .येणाऱ्या पावसाच्या कालावधीत वृक्षारोपण करणेकामी झोन निहाय नियोजन करून परिसरातील शाळा व संस्थाना त्यामध्ये सहभागी करून घेणेकामी स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल.पुणे शहराच्या धरतीवर वृक्षप्राधिकरण पुनर्गठन करणेकामी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येईल. सी. एस. आर निधी मधून प्राणी संग्रहालय परिसरामध्ये कमीत कमी ३०% हरित क्षेत्र विकसित करणे करिता आराखडा तयार करणेत यावा.अक्कलकोट रोड MIDC परिसरातील ओपन स्पेस येथे वृक्षारोपण करणेकामी संस्थांच्या मागणी अर्जानुसार प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावे.शहरातील उपलब्ध ओपन स्पेसची स्वतंत्र यादी तयार करून वृक्षारोपण करिता उपलब्ध करून देण्यात अशी माहिती आयुक्त यांनी दिली.
आयुक्त यांचे आवाहन
पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्था, उद्योजक यांनी जागे सहित सविस्तर प्रस्ताव महानगरपालिका कडे सादर करण्यात यावा. मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करणे त्यांचे मेंटेनन्स करणे. वृक्षारोपण स्पर्धांचे येणाऱ्या कालावधीत आयोजन करणे व वृक्षांचे पुनर्रोपण करणे, हरित इमारत धोरण अंमलबजावणी करणे, नागरिकांना प्रत्येक घरासमोर अथवा सोसायटीमध्ये गार्डन अथवा वर्टीकल गार्डन तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच शहर हरित व सुंदर दिसण्यासाठी हरित अच्छादने तयार करण्यासाठी लोक सहभाग असणे गरजेचे असुन या मध्ये पर्यावरण प्रेमी/सामाजिक संस्था/उद्योजक यांचे मार्फत शाळा, दवाखाने, शासकीय इमारत परिसर, खुल्या जागा हरित पट्टे रोड डिव्हायडर वृक्षारोपण/मेन्टेनन्स करण्यात करीता सहभागी व्हावे त्याकरिता उपायुक्त तैमूर मुलाणी (नोडल अधिकारी) (email- dmcsolapur2@gmail.com) यांचेकडे विहित नुमान सादर करावयाचे असून सदर सादरीकरणाचा मसुदा सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.