म्हणाले
सोलापूर : “राजकिय नाट्य संपले आता कुस्तीला जातो” : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपची ऑफर असल्याचे सांगितले त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले.
पालकमंत्री पाटील भेटले सुशीलकुमारांना….
अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या सात रस्ता येथील निवासस्थानी भेट दिली. आत मध्ये बराच वेळ चर्चा झाली त्यानंतर पत्रकारांनीही पालकमंत्र्याची प्रतिक्रिया घेतली यावेळी चंद्रकांत पाटलांनी सुशीलकुमार शिंदे प्रणिती शिंदे यांचा कामाचे कौतुक ही केले, ते भाजप मध्ये आले तर निश्चितच त्यांचे स्वागत करेल असंही वक्तव्य केले.
हे पण वाचा : शिंदे चाय पे चर्चेला तर साबळे तिळगुळ वाटायला
यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी ऑफर कुणी दिली हे गुप्तच ठेवावे लागते ते समोर आणायचे नसते असे सांगत पत्रकारांशी गप्पा मारल्या यावेळी लगेच बाहेर पडताना “आता राजकीय नाट्य संपले कुस्तीला जातो” असे म्हणताच उपस्थित पत्रकारांमध्ये ही एकच हसा पिकला.
शिंदे – दिलीप माने भेट
मंद्रूप या गावी श्री मळसिध्द यात्रेनिमित्त गुरु म्हेत्रे यांनी कुस्तीचे आयोजन केले आहे. त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रामीणचे नेते सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासोबत हजेरी लावली. या ठिकाणी दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दिलीप माने आणि सुशीलकुमार शिंदे हे एकमेकांच्या शेजारी बसले. बऱ्याच वेळ या दोन्ही नेत्यांनी गप्पा मारल्या. ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक असून त्यांचा तसा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.