सोलापूर : जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे. तसे सोलापुरात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सोलापुरात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी पहाटे फिरायला जाणाऱ्या मॉर्निंग ग्रुप सोबत बराच वेळ गप्पा मारल्या त्यावेळी राजकीय नेते पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मॉर्निंग ग्रुप सोबत शिंदे यांनी चहा सुद्धा घेतला. नागरिकांची बराच वेळ सुशीलकुमार शिंदे यांनी चर्चा केली त्यांची मत जाणून घेतली.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार, सोलापूर समन्वयक अमर साबळे यांनी बुधवारी सकाळ सकाळी विणकर बागेमध्ये जाऊन फिरायला आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. मकर संक्रात सणानिमित्त त्यांना तिळगुळ दिले. नागरिकांशी गप्पा मारल्या येत्या, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंघटित कामगारांच्या पंधरा हजार घरांचे हस्तांतरण करणार आहेत त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साबळे यांनी केले.