Thursday, February 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अतिदुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन ; तब्बल २५ हजार भाविकांची राहणार उपस्थिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 August 2024
in धार्मिक
0
सोलापुरात अतिदुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन ; तब्बल २५ हजार भाविकांची राहणार उपस्थिती
0
SHARES
210
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात अतिदुर्मिळ अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन ; तब्बल २५ हजार भाविकांची राहणार उपस्थिती

सोलापूर : श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान अतिदुर्मिळ अशा अतिरुद्र स्वाहाकाराचे आयोजन विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगर येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात करण्यात आल्याची माहिती मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रमात सुमारे २५ हजार भाविक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रावण कृष्णाष्टमीदिवशी २६ ऑगस्ट रोजी दिवसभर गो पूजन, ध्वज पूजन मंगलमंत्र पठण, महागणपती पूजन, स्वस्तिपुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, ऋत्विक वरण, प्रधानदेवता स्थापन, अग्निमंथन, अग्निस्थापना, कुंड संस्कार, नवग्रह होमम् होणार आहे. यानंतर अतिरुद्र स्वाहाकार आरंभ होणार आहे.

यानंतर श्रावण कृ. नवमी २७ ऑगस्टपासून श्रावण कृ. त्रयोदशी ३१ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मंगलमंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण करून अतिरूद्र स्वाहाकार करण्यात येणार आहे. श्रावण कृ. चतुर्दशी १ सप्टेंबर रोजी अतिरुद्राची पूर्णाहुती होणार आहे. यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत मंगलमंत्र पठण, स्थापित देवता पूजा अभिषेक, लघुन्यास पठण, अतिरुद्र स्वाहाकार सांगता, मंडल देवता होमम्, बलिदान, महापूर्णाहुती, शिवास कर्मसमर्पण, विद्वत पुरोहित सत्कार हे विधी आणि कार्यक्रम होणार आहेत.

दररोज सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, भस्मार्चन, बिल्वपत्रार्चन, हवन होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता शिवपुराण, प्रवचन, अष्टावधान सेवा मंत्रपुष्प, महामंगलारती होणार आहे. दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आले असल्याचेही मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी सांगितले.

अतिरुद्र स्वाहाकारादरम्यान सात दिवसांमध्ये श्री अतिरुद्र मंत्राने अभिमंत्रित ११ हजार रुद्राक्षांचे भाविकांना वाटप, गोशाळा भूमिपूजन, मातृशक्ती पुरस्कार, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, बसवज्योती पुरस्कार तर ३०, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी धर्मसभादेखील होणार आहे. या अतिरुद्र स्वाहाकार आणि धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस मठाचे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, मुंबई येथील उद्योजक सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

काय आहे अतिरुद्र ?

रुद्र हे शंकराचे एक स्त्रोत्र आहे. ते ११ वेळा म्हटले की एक एकादशनी होते. ११ एकादशनीचा १ लघुरुद्र, ११ लघुरुद्रांचा १ महारुद्र. असे ११ महारुद्र केले की १ अतिरुद्र होतो. रुद्राचा अविष्कार ऋग्वेदापासून आहे. ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहेत. रुद्राचे एक स्वरूप भद्र म्हणजे कल्याणकारीही आहे. रुद्रसूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरूप तसेच जलस्वरूप आहे. तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे, असे मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी म्हणाले.

Tags: Basavaraj mathShivputra sarwadkarSolapur
SendShareTweetSend
Previous Post

“आमचं ठरलय” भाजपच्या या बॅनरची सध्या सोलापुरात जोरदार चर्चा…

Next Post

प्रणिती ताईंच्या मतदारसंघातील शहर मध्य व दक्षिण  ठरणार लक्षवेधी ; नरोटे व हसापुरे यांचे सार्थक होणार का?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970600
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group