मोकाशी बंधूंचे कार्य कौतुकास्पद ; जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे आशीर्वाद ; गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सन्मान
सालाबादप्रमाणे यंदाही शिवचंद्र सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे व तसेच बँकेतील नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचाही सत्कार या संस्थेच्या मार्फत करण्यात आले.
बृहणमठ होटगी मठ येथे चन्नवीर महास्वामी व तपोरत्न योगीराजेंद्र महास्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात. आले. मोकाशी परिवाराकडून श्रीक्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश कोठे यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स -को ऑप असोसिएशन लिमिटेडच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश वाले तसेच श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे नूतन चेअरमन नरेंद्र गंभीरे व तसेच व्हाईस चेअरमन सुचेता मिलिंद थोबडे यांचाही सत्कार संस्थेतर्फे जगद्गुरु यांच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले.
प्रमुख पाहुणे राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, शोभाताई बनशेट्टी, अविनाश मार्तंडे, श्रीशैल रणधीरे, बंटी चंदनशिवे, मनिष मसरे यांचाही सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. तसेच जगद्गुरु बृहण होटगी मठ यांच्या कडून मोकाशी दाम्पत्यांचाही सत्कार करून दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार ट्रॅपी प्रमाणपत्र व मिडल देऊन गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटण्यात आले.
विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे: तन्मय जाधव 98.7 श्लोक पाटील ९७.४०% श्रेया तोडकर 97.40% गार्गी गाडेकर 97.20% आरुष देशट्टी 97.% चैत्राली कोरे 92.80% वैभवी मसरे 92 % सुकन्या साखरे 91 % कादंबरी पाटील 93 % योगीराज बिराजदार 92% पारस रणधीरे 95%
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोकाशी मित्र परिवरतील सदस्य विकास शिवानंद हिरेहब्बू व मनीष मसरे, बसवराज दर्गोपाटील, सारंग मसरे, अनिल मसरे, लक्ष्मण कलाकत्ते, गणपा वडणे, निलेश मसरे, सागर दीक्षित, शंकर सातभाई, महेश शिवशट्टी, संकेत पाटील, विष्णू जोशी, संजय वाले, महादेव नागशट्टी, ओमकार मसरे, शुभम हिरके, केदार मसरे, चिदानंद मसरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रेणुका पट्टणशेट्टी, शितल महिमाने यांनी केले तर आभार शिवचंद्र सामाजिक संस्थेचे सचिव गुरुशांत मोकाशी यांनी मानले. या संस्थेचे कार्य बघून विद्यार्थ्यांचे पालक गुरुलिंग होनमाने यांनी या संस्थेचे आभार मानले.