दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगार मिळेल ; सुदीप चाकोते यांचा मोदींवर हल्लाबोल
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मध्ये ‘युवा संवाद विथ प्रणिती शिंदे’ या कार्यक्रमाचे आयोजन सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्याद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गर्जा महाराष्ट्र माझा या गीताद्वारे करण्यात आले.
सुदीप चाकोते म्हणाले, शहर उत्तर विधानसभा मध्ये सेवादल यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांकडून दररोज किमान 2000 घरापर्यंत पक्षाचे प्रचार पोहोचेल असे सांगत सोलापूर लोकसभा मतदार संघाकडून प्रणिती शिंदे यांना सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार आपण दिल्लीत निवडून पाठवू, ताई यावेळी कॅबिनेट मिनिस्टर होतील व राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान होतील त्यासाठी सर्व युवकांनी दिल्लीत बसलेल्या एका व्यक्तीला बेरोजगार करा म्हणजे सर्व युवकांना रोजगार मिळेल अशा शब्दात भाजपा पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांना निवडून द्या, त्या गोरगरीब, मागासवर्गीय व दलित या वर्गासाठी केंद्रामध्ये काम करतील, त्या मराठी, हिंदी व इंग्लिश या भाषेमध्ये काम करण्यास सक्षम आहेत.
या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सिद्राम चाकोते, सुरेश हसापुरे, उदयशंकर चाकोते, अशोक निम्बर्गी, केदार उंबरजे, महिला अध्यक्षा प्रमिला तूपलोंढे, सुनील रसाळे, अश्फाक बळुर्गी, अशोक कलशेट्टी, संजय कुराडे, विवेक कन्ना, राजेंद्र शीरकुल, धीरज बंदपट्टे, रेखा बिनेकर, नूर अहमद नलवार, मल्लिनाथ सोलापुरे, मौलाली शेख, अमीर शेख, रवींद्र म्हेत्रे, सागर कोळी, दत्ता पवार, नितीन हळसगी, रुपेश तडसरे, शेखर पाटील, नागराज बिराजदार, यांच्यासह शहर उत्तर मधील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.