महेश कोठे गटाचा रात्री बारा वाजता जल्लोष ; सत्तेत राहिले तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी अनपेक्षितपणे सुधीर खरटमल यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष पदी तोफिक शेख व पद्माकर काळे यांना संधी मिळाली तर माजी महापौर यु एन बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी अध्यक्ष भारत जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवडी करण्यात आल्या आहेत.
या निवडी मध्ये पूर्णपणे महेश कोठे यांचे वर्चस्व राहिले. रात्री पावणे बाराच्या सुमारास महेश कोठे यांच्यासह सुधीर खरटमल, नलिनी चंदेले, बेरिया यांच्यासह काही कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून या निवडीचा जल्लोष केला.
महेश कोठे म्हणाले, शरद पवार यांनी या निवडी करून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला असल्याचे सांगत मला प्रवेशाची अनेक दिवसांपासून ऑफर आहे परंतु सोलापूरच्या आयटी चा प्रश्न केवळ शरद पवार यांनी सोडवायला त्यामुळे मी त्यांच्यासोबतच राहणार असे सांगून सत्तेत असेल तरच कामे होतात हा कार्यकर्त्यांचा गैरसमज असल्याचे ते म्हणाले.