महाराष्ट्रात सेवानिवृत्त निमलष्करी जवानांना नोकरीत आरक्षण द्या ; उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता केंन्द्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघ, सोलापूर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी सोलापूर शाखेचे अध्यक्ष संगमा बिराजदार, उपाध्यक्ष मारूती सुरवसे, सचिव दत्तात्रेय येलपले, ब्रम्हानंद देसाई, महेशं बुधाले, विवेकानंद सावंत अन्य जवान उपस्थित होते. यावेळी आपल्या मागण्यांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. त्या मागण्या खालील प्रमाणे आहेत….
1. गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे शासन निर्णय क्र. 27011/100/2013 दि 23/11/2012 प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात निमलष्करी जवानांना सुविधा देण्यात यावी.
2. महाराष्ट्र शासन निर्णय क्रं संकिर्ण 2016 / प्र क 59/ नहव-20 दिं 09/09/2020 नुसार सैन्य दलातील जवानाप्रमाणेच निमलष्करी दलातील जवानाच्या महानगर पालिका, नगरपंचायत, नगरपालिका ग्ामपचांयत इत्यादी स्तरावर राज्य शासनाने घरपटी मध्ये सवलत देण्यात यावी.
3. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हयात निमलष्करी दलातील जवानांसाठी सी०जी०एच०एस०अतंर्गत मेडीकलची सुविधा पुरविण्यात यावी.
4. भारतीय सैन्य दलातील सेवा निवृत जवानाप्रमाणे निमलष्करी दलातील जवानानां प्राधान्य प्रमाणे शासकीय व अशासकिय विभागात नौकरीत आरक्षण देऊन पुनर्वसन करण्यात यावे
5. निमलष्करी दलातील जवानाच्या पाल्यांना शिष्यवृत्ती परदेशात शिकण्यासाठी, व इतर राज्यात प्रशिक्षणासाठी, सेवापूर्व प्रशिक्षणासाठी (HAD. MA OTA) व तत्सम संस्थानामध्ये तसेच PCTC नाशिक येथील संस्थेमध्ये स्पर्धात्मक परिक्षेस आर्थिक सवलत देण्यात यावी.
6. प्रत्येक जिल्हयात सैनिक कल्याण कार्यालयाप्रमाणे निमलष्करी कल्याण कार्यालयची स्थापना करण्यात यावी.