काका साठे यांनी उमेश पाटलांना सुनावले ! सभेत बोलण्यास उभारल्यावर लोक आम्हाला खाली बसवत नाहीत
सोलापूर : शरद पवार या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी वयाच्या निकषानुसार राजीनामा दिला, तोच वयाचा निकष जिल्हाध्यक्ष काका साठे यांना का नाही असा प्रश्न अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.
त्यावर बुधवारी जिल्हाध्यक्ष काका साठे हे जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना या विषयावर छेडले.
आता वयोमानानुसार तुम्हीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आपली काय प्रतिक्रिया असे विचारले असता,
अशांनी आमच्यावर विनाकारण भुंकू नये. आमच्या पक्षात काय करायचे ते आम्ही ठरवू, त्यांनी त्यांचा पक्ष पहावा. आमचे काम, निष्ठा पाहून आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जनतेचे पाठबळ आम्हाला आहे. सभेत बोलण्यास उभारल्यावर लोक आम्हाला खाली बसवत नाहीत, याचे भान त्यांनी ठेवावे.