सोलापुरात प्रभाग 22 होतोय विकासाचे मॉडेल ; किसन जाधव यांचा प्रयत्न
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसह सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही प्रभाग क्रमांक २२ रामवाडी पोगुल मळा येथील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचं शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत रक्कम १५ लाख ५० हजार १०३ रुपये खर्चित रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आले.
याप्रसंगी नागेश अनिस जाधव , दशरथ गायकवाड, आकाश जाधव,अनिल सुरवसे, जावेद शेख, श्रीकांत पाटील, तौफिक शेख,रेशव गायकवाड, अब्बास बागवान, आयुष्य प्रथमेश गायकवाड, शकील चौधरी,जावेद चौधरी, पुष्पाताई जाधव,कोमल जाधव,मंगलताई रुपनर, रेणुका ताई गायकवाड,नबी मकानदार,मुन्नीताई सय्यद,श्रीदेवी नागोताई वाघमारे,सरस्वती बनसोडे, आयुष्या खान,मनीषा गायकवाड, अनिता शिंदे,लक्ष्मी बनसोडे,राबिया शेख,शांताबाई शिंगे आदींच्या उपस्थितीत या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे विधिवत पूजन करण्यात आले.
प्रभागातील सर्वच रस्ते लवकरच सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड आणि आमच्या प्रयत्नातून पूर्ण होणार आहेत रस्त्याबरोबरच लाईट,पाणी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, शैक्षणिक व वीज या अन्य मूलभूत सुविधांसह सर्वच विकास कामे करण्यास प्राधान्यक्रम दिला जाईल असेही यावेळी किसन जाधव म्हणाले.
यावेळी प्रभाग क्रमांक २२ मधील महिलांसह अबाल वृद्धांनी तसेच नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रत्न किसन जाधव यांचे मनस्वी आभार मानत भला मोठा पुष्पहार शाल व टोपी घालून त्यांचे स्थानिक रहिवाशांनी आभार मानले. कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांचे प्रभाग क्रमांक २२ मधील विकास कामांसाठी मोठे योगदान असल्याच्या भावना देखील यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.