काँग्रेस प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांची सिंहासनला सदिच्छा भेट
सोलापूर : सोलापूर आणि डिजिटल मीडिया माध्यमातून सर्वात वेगवान आणि विश्वासाहर्ता बातम्या देणारे माध्यम म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्या सिंहासन न्यूज चॅनलच्या कार्यालयाचे काही दिवसांपूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्या सिंहासन कार्यालयाला काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादक प्रशांत कटारे यांचा पुष्पहार आणि नारळ देऊन सत्कार केला.
एकूणच कार्यालयाची पाहणी करत त्यांनी सिंहासनच्या बातम्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
