सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार या नेत्याच्या गळ्यात ; हे आहेत इच्छुक
सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्याने आणि नंतर पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पद सध्या रिक्त आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळण्यासाठी मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार यांच्याकडे तात्पुरता पदभार दिला होता.
दरम्यानच्या काळात सुरेश हसापुरे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी आघाडीवर होते पण त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकी वेळी भाजप नेत्यांसोबत घरोबा वाढवला ते संचालक झाले त्यामुळे जिल्हाध्यक्षपदामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही.
आता जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे, सातलिंग शटगार, राजेश पवार, देवानंद गुंड पाटील, अर्जुन पाटील, सांगोल्याचे राजकुमार पवार हे इच्छुक आहेत. युवकांमधून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळ्याचे सुदर्शन आवताडे यांचेही नाव समोर येते. काँग्रेस नेते पंढरपूरचे नेते भगीरथ भालके यांना पद देण्याच्या तयारीत असल्याचे कळते पण भालके पण इच्छुक नसल्याची माहिती मिळतेय.


लिंगायत समाजाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे हे नेते आता पक्षातून बाहेर पडले आहेत. एकूणच अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर आणि मंगळवेढा या भागात असलेला लिंगायत समाज पाहता माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांचे नाव आघाडीवर आहे. ही मोठी पोकळी भरून काढण्यासाठी हत्तुरे यांच्या नावाचा विचार पक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर निरीक्षक मोहन जोशी यांनी पण मुलाखती घेऊन तीन नावे प्रदेशकडे पाठवले असून त्यात हत्तुरे यांच्यासह सातलिंग शटगार यांचे पण नाव असल्याची माहिती आहे.