अक्कलकोट भाजप मध्ये श्रेयवादाचे राजकारण पेटले ! आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अक्कलकोट मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आली असून पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी एकरूप उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्यातील मंजुरी वरून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना निशाना केला आहे.
एकरुख उपसा सिंचन योजनेमुळे अक्कलकोट शहराचा व ५१ गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे, अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावामधील १०११० हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १९ गावची ७२०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे रे निर्देशनास आणून दिले व ही योजना अक्कलकोट व दक्षिण सोलापूरसाठी किती महत्वाची आहे हे मी त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो.
पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना या योजनेचे आयते बटण दाबण्याचे भाग्य मिळाले, या संपूर्ण सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाचा पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः परिश्रम घेऊन केला असून या योजनेचा वास्तव प्रवास मी जनतेसमोर मांडत आहे. व माझ्याकडे माजी मुख्यमंत्री यांचे आदेश व जलसंपदा मंत्री यांचे प्रशासकीय स्तरावर चालू असलेल्या कार्यवाहीचे पत्र हे पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. व मी ते पुरावे सोशल मिडीयावर वायरल केलो आहे. म्हणून एकरूख उपसा सिंचन योजनेचे अंतिम टप्याचे श्रेय आजी-माजी आमदारांनी घेऊ नये.
आपल्याकडे अंतिम टप्याला पाठपुरावा केल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास ते जनतेला दाखवावे व मिडियावर वायरल करावे. अन्यथा फुकटचे श्रेय घेण्याचे प्रयत्न आमदार महोदयांनी करु नये. अन्यथा आपण श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्यास आपला खोटारडेपणा जनते समोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही, हे ही ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले. यावेळी आनंद तानवडे उपस्थित होते.