IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव
सोलापूर : दोन ते अडीच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज पासून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांचे स्वागत जंगी केल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांवर विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजवण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देगाव येथील जिल्हा परिषदेमध्ये जाऊन चिमुकल्यांचे पहिल्या दिवशी पुष्प देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पापरी या जिल्हा परिषद शाळेत जाऊन स्वतः विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात आयएएस अधिकाऱ्यांच्या हातून गुलाब पुष्प आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात होता तसेच यावेळी शिक्षण विभागाने प्रवेशाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तक देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.