अखेर अडकले ! सरपंच हरीश राठोडसह उपसरपंच ग्रामसेवकावर गुन्हा दाखल ; चार कोटीचा भ्रष्टाचार
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिशचंद्र राठोड, उपसरपंच आर. व्ही. जाधव व ग्रामसेवक बी. डी. पाटील यांच्यावर ४ कोटी ४२ लाख ९१ हजार ९९३ रूपयाचा अपहरण केल्याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहरण झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोकआयुक्त व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेवून झेडपीचे बांधकाम दोनचे कार्यकारी अभियंता यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला. याप्रकरणी विस्तार अधिकारी सदाशिव भिमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे.
फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये १ एप्रिल २०२३ ते १५ ऑक्टोंबर २०२४ अखेर आर्थिक अपहर झाला आहे. विशेषतः तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्याकंन पूर्वी खर्च करणे, एकाच कामावर दोन वेळा खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मुल्याकंन नोंदविणे, मुल्याकंन पूर्वी खर्च करणे, रोखीने खर्च, एकाच कामासाठी २ यंत्रणा कार्यरत असणे, महाराष्ट्र ग्राम पंचायत लेखासंहिता नियम २०११ चे पालन न करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तीक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रीक मान्यता न घेणे, सन-२०२३-२०२४ मधील १५ वा वित्त आयोग अंतर्गत लेखा संहिता नियम ५१ चे पालन न करणे, व्यक्ती/संस्था/ठेकेदार यांचे नावे निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी न करता देयके अदा करणे, एकाच ठेकेदारास बीड कॅपेसिटी न तपासता अनेक कामे देणे, कॉक्रीट रस्त्यांचे काम काजात अनियमितता, मोजमाप पुस्तिकामध्ये ऑथोरिटी व्यवस्थित न लिहीणे,
काँक्रीटीकरणावर डांबरीकरण करणे, रस्त्यांच्या व भूमीगत गटारांच्या कामांचे तुकडे पाडणे, मंजुर असलेली कामे ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणे, साहित्याची खरेदी करताना जीईएम पोर्टलचा वापर न करणे, कामांची काही कामे होटगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणे, सन-२०२३-२०२४ मधील तांत्रीक मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या संख्येपेक्षा ग्रामपंचातीकडील झालेल्या कामांची संख्याही ग्रामपंचायतीकडील प्रमाणकानुसार जास्त असणे, पदभार हस्तारीत न करणे, चौकशी समितीस दप्तर उपलब्ध न करून देणे, आर. ओ. प्लॉट एटीएम मधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणे. हा आर्थिक अपहर सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या संगनमताने झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.