धर्मराज काडादींच्या दक्षिण दौऱ्याला सुरुवात ; काडादींचा दौरा शिंदे की पवारांच्या आशीर्वादाने
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरत काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसलेले सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूरचा दौरा करणार आहेत परंतु सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर चर्चेत आलेले, सहानुभूती निर्माण झालेले काडादी हे विधानसभेसाठी इच्छुक झाले, ते दक्षिणचा दौरा करणार आहेत. काडादी यांना आशीर्वाद कोणाचा सुशीलकुमार शिंदे की शरद पवार असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्या. त्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर मंगळवेढा या चार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा वाढली. त्यामुळे इच्छुकांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे किती निष्ठावंतांना न्याय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण दक्षिण मध्ये अचानक काडादी यांची एन्ट्री झाल्याने इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
धर्मराज काडादी यांचे काँग्रेसमध्ये योगदान काय? त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी किती प्रयत्न केले? तसे पाहायला गेले तर काडादी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे समर्थक मानले जातात. असे असताना ते काँग्रेसकडून इच्छुक कसे काय झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून जरी शरद पवार हे सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय गुरु मानले जात असले तरी सुशीलकुमार शिंदे यांचे सोलापुरात असलेले राजकीय प्रस्थ पाहता त्यांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधीही डोके वर काढू दिले नाही. काँग्रेस मधूनच राष्ट्रवादीत गेलेले महेश कोठे, सुधीर खरटमल यु एन बेरिया, नलिनी चंदेले यांनी किती राष्ट्रवादी वाढवला हा सुद्धा प्रश्न आहे. मग शरद पवारांना मानणाऱ्या धर्मराज काडादी यांना शिंदे स्वीकारणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
काडादी यांच्या शिक्षणसंस्था आहेत, साखर कारखाने आहेत, त्यांना सुंरुग लावण्याचा काम भाजपा नेते करत असल्याचा आरोप केला होता, दोन देशमुख आमदार मला त्रास देत आहेत हे पण जाहिर सभेत सांगत असतात, मग त्यांना चांगली संधी उतर मतदारसंघात आहे. तिथे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. चाकोते, शिवदारे याच मतदारसंघात राहतात. त्याना खरच भाजप पक्षाचा त्रास वाचवायचा असेल तर ते त्या मतदारसंघात ऊभारुन निवडणूक लढवावी असे जाणकारचे मत आहे. तेथील आमदार विजय देशमुख विरोधात अनेक भाजपा नेते बंडखोरी करायला तयार आहेत, ती जागाही तुतारीला सुटण्याची दाट शक्यता आहे. काडादी ना तिकीट द्या म्हणून शिफारस करणारेही उतर सोलापूर मधीलच जास्त नेतेगण होते.
उत्तर सोलापूरची जागा कॉंग्रेसला जर सुटली तरीही प्रणिती शिंदे त्या जागेवर काडादी ना संधी देण्यास तयारी दर्शवतील. तरी या सर्व घडामोडींबाबत निष्ठावंत आणि ज्यांनी पक्षाबरोबर राहून प्रामाणिकपणे काम केले त्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्ष घेईल का? खासदार प्रणिती शिंदे सध्या CBC कमिटीवर आहेत तिकीट वाटपात त्यांचाच वरदहस्त राहणार आहे. ज्या नेत्यांनी प्रणिती या खासदार पदी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले त्याचा पण विचार होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.