भाजप चारसौ पार नाही, तडीपार, हद्दपार होणार…..; सोलापुरात काँग्रेसने फोडले फटाके, वाटली मिठाई
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240321-WA0071.jpg)
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून आनंद साजरा केला.
यावेळी चेतन नरोटे, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, अमोल भोसले, दीनानाथ शेळके, रुपेश गायकवाड, शाहू सलगर, श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर उपस्थित होते.