AIMIM शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांचे परिवारासह मतदान
एमआयएमचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न दिल्याने भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत सुरू आहे.7 मे रोजी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. प्रत्येक नागरिक हे आपला हक्क बजावत आहेत. सोलापूर एमआयएम प्रमुख फारूक शाब्दी यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर ते म्हणाले, ही संविधान वाचवायची लढाई आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी घराच्या बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, आणि आपल्या संविधानाला मजबूत करावे असे आवाहन केले.