रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून सोलापुरात मोठ्या ऋषीने आणि उत्साहात मतदान केले जात आहे. कडाक्याचे ऊन असले तरी लोक एवढ्या गर्मीमध्ये मतदानाला बाहेर पडत आहेत.
बुधवार पेठ भागात मतदानाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी आपल्या पत्नीसह येऊन महानगरपालिका शाळा क्रमांक 11 या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीच्या या उत्सवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिलेला मतदानाचा पवित्र हक्क सर्वांनी बजवावा आणि लोकशाही बळकट करावी असे आवाहन सरवदे यांनी केले आहे.