सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे तातडीचे आवाहन ; नागरिकांनों…….
सोलापूर शहरातील व जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की, 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. सदरची यादी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येऊन सदरच्या मतदान यादीचे वाचन ग्रामसभा, वॉर्डसभा यामध्ये करण्यात आले. 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी2024 पर्यंत 1 लाख 2 हजार 850 मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. वेळोवेळी मतदारांना आवाहन करण्यात आले की, मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे.
दिनांक 10 एप्रिल 2024 पर्यंत ज्या मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरुन दिले अशा 83 हजार 385 मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली. बी.एल.ओ. यांनी घरोघरी जाऊन दोन वेळी तपासणी करण्यात आली. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे तपासणी करुन कमी करण्यात आली आहेत. जर एखादया मतदाराचे नाव कमी झाले असेल तर तपासणी करुन नव्याने त्यांचा फॉर्म नंबर 6 भरुन घेऊन लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मतदार यादीत समाविष्ट करण्यात येत असून यातील एकही नागरिक विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.