सोलापुरात प्रणिती शिंदे याच विजय होणार ; आरिफ शेख यांचा दावा, कुटुंबीयांसह केले मतदान
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी महापौर आरिफ शेख यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पत्नीसह येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेला प्रतिसाद पाहता काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.