मयताची नावे मतदार यादीत ; आमची का नाहीत? सोलापुरात केतन वोरासह नागरिक भडकले !
सोलापूर : सोलापुरात लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. सोलापुरात उन्हाचा पारा 44 ओलांडल्याने नागरिक सकाळी सातलाच मतदानाला बाहेर पडले आहेत लवकरात लवकर मतदान करून मोकळे व्हावे. या भूमिकेत नागरिक दिसून येत आहेत.
दरम्यान सकाळी सात वाजता मतदानाला बाहेर पडलेले सोलापुरातील उद्योजक केतन वोरा यांनी जेव्हा मतदार यादी पाहिली त्यामध्ये त्यांचा नावापुढे डिलीटेड असे शिक्का मारला होता परंतु त्यांचे मयत आई-वडिलांची नावे मतदार यादीत होती त्यामुळे ते अधिकच भडकले.
प्रशासनाला ही तक्रार मांडली मात्र प्रशासन गांभीरतेने घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केतन वोरा यांच्यासह इतर नागरिकांच्या सुद्धा अशाच तक्रारी समोर आल्या आहेत ते काय म्हणाले पहा