पोलीस आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क ; मतदारांना दिले असे प्रोत्साहन
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापुरात नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. सोलापूरचे तापमान 43 डिग्री सेल्सिअस असूनही नागरिक त्याच उत्साहात मतदान करीत आहेत प्रशासनाने मागील काही दिवसापासून केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येतोय.
दरम्यान नागरिकांसोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटिल फ्लावर प्रशालेत मतदान केले तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सुद्धा आपल्या पतीसह लिटिल फ्लावर प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला. महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांनी सेंट जोसेफ प्रशालेमध्ये मतदान केले. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.