फारूख शाब्दी यांचा सोलापूर एआयएमआयएम टीमच्या वतीने सत्कार
हाजी फारूख शाब्दी यांच्या वाढदिवसानिमित्त AIMIM च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दारुलसलाम येथे जनरल सेक्रेटरी कोमारोव्ह सय्यद यांच्या मार्गदर्शनात सत्कार संभारम पार पाडला.
यावेळी कोमारोव्ह सय्यद म्हणाले, फारूख भाई सारखा नेता आम्हास मिळाला हे आमचे सौभाग्य आहे. फारूख भाई यांनी कुठल्याही फायद्याचा विचार न करता सोलापुरातील लोकांना सढळ हातांनी मदत केली आहे. कोविड काळात सोलापुरातील जनतेला कोणी वाली नव्हता, कोण लोकप्रतिनिधि त्यांच्या मदतीला आला नाही पण कुठलेही स्वार्थ न पाहता शाब्दी यांनी लोकांना अन्नधान्य किट वाटप करून लोकांचे दुःख थोडे कमी करण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील जनता त्यांना आपला मुलगा मानत आहे, गरीब, कष्टकारी आणि निराधार लोकांसाठी फारूख भाई हे एका वरदानापेक्षा कमी नाहीत.
सय्यद यांनी यावेळी लोकांना आवाहन केले की, आपण सर्वांनी फारूख भाई शाब्दी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत विजयी करावे.
यावेळी सोलापुर Aimim चे प्रमुख पदाधिकारी इलियास शेख ( उपाध्यक्ष ), नासिर मंगलगिरी ( शहर सचिव), गाझी जाहगिरदार ( माजी नगरसेवक) मोहसिन मैंदर्गीकर( युवा अध्यक्ष), अजहर हुंडेकरी( माजी नगरसेवक), अझहर कोरबू , अशफाक मेंबर , एजाज बागवान ,दौला कुमठे ,अय्युब रचभरे, इसामोद्दीन पिरजादे, इक्बाल पठान, हारीस कुरेशी, याकूब शेख, सचिन कोलते, वसीम शेख ,मोसिन शेख , नल्लाबंदू,इम्रान हवालदार, मुसा शेख, मझहर कोरबू , आसिफ जमादार, सरफराज शेख , एजाज अत्तार , इसाक शेख, सलमा सय्यद, अनिसा मोगल,वसीम शेख, बशीर सय्यद, बशीर शेख, विक्रम वाडे, मचिद्र लोकेकर, इम्रान पठान, अनिसा डोका, नसिमा कुरेशी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.