सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच जिल्हा परिषद गाठली ते जिल्हा परिषद आल्यानंतर कर्मचारी ज्याठिकाणी फेस रिडींग करून हजेरी लावतात त्या ठिकाणी त्यांनी ठाण मांडला, लेट आलेल्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना पाहताच काहीसे गडबडले मात्र अध्यक्ष कांबळे यांनी गांधीगिरी करत ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी चेहऱ्यावर लावले नाहीत त्यांना मास्क लावण्याची विनंती केली, विशेष म्हणजे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांना चहा पाजवला नंतर ते सामान्य प्रशासन अर्थ विभाग महिला बालकल्याण समाज कल्याण माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण आरोग्य विभाग बांधकाम विभाग कृषी विभाग ग्रामपंचायत विभाग या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि जे जे कर्मचारी मस्त लावत नाहीत त्यांना मास्क लावा सोशल डिस्टन्स पाळा हात सॅनिटायझर अथवा साबणाने स्वच्छ धुवा अशा विविध सूचना केल्या, जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वभाव हा साधा, सरळ व मजेशीर असल्याने काही मजेदार प्रसंग पहायला मिळाले,
जिल्हा परिषद माझे कुटुंब, ती माझी जबाबदारी-कांबळे
राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव ठाकरे यांची संकल्पना असलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी प्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने इथं येणारे नागरिक, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे . कोरोना संसर्ग होऊ नये या उद्देशाने आज सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मी मास्क लावा, शारीरिक डिस्टन्स ठेवा, हात धुवा हे तीन नियम पाळण्याचे हात जोडून आवाहन केले आहे.



















