असे असले तरी दुकानदार, पीठ चक्कीवाले, हातगाडीवाले इत्यादी लोक जे कोरोनाच्या प्रसारामध्ये उच्च प्रसारक आहेत ते कोरोनाच्या फैलाव थांबविण्याच्या कार्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नाहीत. दुकानदार व तत्सम व्यक्ती हे ग्रामसेवक , स्थानिक पातळीवरील कर्मचारी यांना प्रतिसाद देत नाहीत. याऊलट कर्मचारी यांना दमदाटी करीत आहेत. खरेदी-विक्री जास्त प्रमाणात व्हावी म्हणून आरोग्याची काळजी न करता ग्राहकांची प्रचंड गर्दी दुकानात करीत आहेत, होऊ देत आहेत.
बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांना कटू प्रसंगालाही सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा सर्व दुकानदार, चक्कीवाले, पानटपरी, केशकर्तनालये, सराफा दुकाने अशा सर्व प्रकारच्या आस्थापनेसाठी त्यांची जबाबदारी अधोरेखित करुन स्वत:हूनच त्रि-सूत्रीचे पालन करण्याबाबत जागृत करण्यासाठी ” माझे दुकान, माझी जबाबदारी ” हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे.
माझे दुकान, माझी जबाबदारी ” या अभियानात प्रत्येक दुकानदाराने पाळावयाची दशसूत्रे अशी आहेत…….
1) प्रत्येक दुकानदार / आस्थापना धारकांनी कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम स्वत:हून स्वत:ची जबाबदारी म्हणून पाळावे.
2) मास्कविना प्रवेशास मनाई (No Mask, No Entry) चा फलक दर्शनी भागात मोठ्या कक्षरात लावावे.
3) दुकानात बसणाऱ्या मालक, नोकर, मजूर इत्यादींनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
4) दुकानात येणाऱ्या ग्राहकांनासुध्दा मास्क, रुमाल बांधून आल्याशिवाय दुकानात प्रवेश नाकारावे.
5) दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घेणे. दुकानाचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन त्यानुसार 4/5 ग्राहकांनाच प्रवेश देणे, इतरांना नंतरची वेळ देणे.
6) जास्त विक्री / नफा होण्याचे धोरण अवलंबण्यापेक्षा स्वत:चे आरोग्य, स्वत:चा जीव अतिशय महत्त्वाचा आहे याची जाणीव ठेवणे व त्याप्रमाणे सर्व खबरदारी / उपाययोजना अंमलात आणणे.
7) प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या वेळेचे पालन करणे, स्वत: दुकानातील इतर नोकरांची चाचणी (Testing) करुन घेणे व चाचणी करणाऱ्यास सहकार्य करणे.
8) दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण व पाणी ठेवणे व त्याचा नियमित वापर करण्यास प्रवृत्त करणे.
9) दुकानदाराने स्वयंस्फूर्तपणे मास्कचा वाटप आपल्या दुकारात येणाऱ्या ग्राहकांना करणे, तसेच संपर्क, शोध (Contact, tracing) घेण्यासाठी स्थानिक पातळीवर अधिकारी / कर्मचारी यांना मदत करणे.
10) दुकानातील वस्तू सॅनिटायझर करुन ग्राहकांना देणे, केशकर्तनालयासारख्या सेवा देणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण साहित्य हे प्रत्येकवेळी पूर्णपणे सॅनिटायझर करुन वापरणे.
दुकानदार म्हणून माझ्या ग्राहकाची व स्वत:ची काळजी घेणे हे प्रथम जबाबदारी असल्याचे सदैव लक्षात ठेवून त्यानुसार वर्तणूक ठेवणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या दशसूत्रीचा सदैव अंमलबजावणी सर्व लहान-मोठे दुकानदार, गाडीवाले, पानटपरी व तत्सम सर्व व्यापारीवर्गाने करावे असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्तपणे ही जबाबदारी पार पाडावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समक्ष सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.




















