ही राजकारण करण्याची वेळ नाही. फक्त सोलापुरात बेड ,ऑक्सिजन, इंजेक्शन याची कमतरता नसून, संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातही आहे. अशा परिस्थितीमध्ये मला बीजेपी, एमआयएम, शिवसेना , राष्ट्रवादी , कम्युनिस्ट व इतर सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे मिळून एकत्र येऊन लोकांना कसं मदत करता येईल आणि लोकांचे जीव कसा वाचवता येईल यावर आपण लक्ष केंद्रित करुयात .आपल्याला जेवढ्या गरीब गरजू लोकांना मदत करता येईल तेवढी आपापल्या परीनं मदत करावी. आता लोकांना भाषणाची नाही राशन आणि पैशाची गरज आहे ती करावी . बीजेपी काम करतंय का , काँग्रेस काम करतंय, कम्युनिस्ट काम करतंय का शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम काम करतंय हे लोक जागृत आहेत, लोक ठरवतील . योग्यवेळी लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, कोण काम करतं, कोण करेल , कोण देखावा करत आहे ही लोकांना पूर्णपणे जाणीव आहे आणि आमदारांना विनंती आहे की मतदारसंघात सगळ्यांनी मोठा जम्बो कोरोना सेंटर काढावे आणि लोकांना बेड मिळत नाही ,ऑक्सिजन मिळत नाही त्याची व्यवस्था करावी . आता आरोप-प्रत्यारोप , राजकारण बाजूला ठेवून आपण सोलापूरासाठी, महाराष्ट्रासाठी या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी एकत्र येऊन काम करावे, कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढावे .
मनोज प्रकाश यलगुलवार कार्याध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी



















