रेमडिसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन, व कोरोना लस वितरणामध्ये सोलापूरवर होत असलेल्या अन्याया विरोधात भाजप खासदार, आमदारांनी लाक्षणिक आंदोलन करून सरकारला धारेवर धरले होते, बारामतीकर व पालकमंत्री दत्तामामा हे टार्गेट होते, आमदार सुभाष देशमुखांनी तर जिल्ह्यात 2 खासदार व 8 आमदार हे भाजपचे असल्यानेच सोलापूरवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला होता या विषयी शुक्रवारी पालकमंत्री भरणे यांनी कोरोना आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी भाजपच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया घेतली असता ही राजकारण करण्याची वेळ नाही, राजकारण करायचे तिथं करू की, मात्र आता आपले शहर आपला जिल्हा कोरोनातून बाहेर काढायचा आहे, लोकांना कसा आधार देता येईल, चांगली सेवा कशी देता येईल, लसीकरण कसे वाढवता येईल, ऑक्सिजन कसे मिळेल, रेमडिसिव्हीर इंजेक्शन कसे मिळतील हे पाहणं गरजेचे आहे, न्यायालयात जाऊ द्या, लोकशाही आहे, परंतु लसीचे, रेमडिसिव्हीरचे वाटप कुणाकडून येते हे त्यांना समजले असते तर प्रश्न मिटला असता, जिल्ह्यातील भाजपचे 2 खासदार , 8 आमदार यापैकी एकाने तर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली का? किती कोविड सेंटर काढले, किती लोकांना जेवण पुरवले हे त्यांनी सांगाव, भाजपमध्ये अनुभवी नेते आहेत, माजी मंत्री आहेत, राजकारण करण्यापेक्षा आपण मिळुन सोलापूरला कोरोना मुक्त करूया.
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...



















