ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग पाहता जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्राम समिती गठीत केली आहे . ही समिती परराज्य व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणार आहे. एखाद्या गावांमध्ये परजिल्हा किंवा परराज्यातून एखादा व्यक्ती आल्यास त्या नागरिकाची माहिती ग्रामपंचायत स्तरावर तयार करून ती पुढे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांना सादर करण्यात येणार आहे, बाहेरून व्यक्ती आल्यास त्याची तपासणी स्थानिक खाजगी डॉक्टर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेण्यात यावी, तपासणी केल्यानंतर करोना सदृश्य लक्षणे न आढळल्यास संबंधिताला होम आयसोलेशन मध्ये ठेवावे, कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला इन्स्टिट्यूशन आयसोलेशन मध्ये ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्याला माहिती द्यावी यासह इतर अनेक गोष्टींवर ही ग्राम समिती वॉच ठेवणार आहे.





















