दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणाचा ‘केंद्रबिंदू’ असलेल्या सीना नदीवरील बंदलगी गावच्या बंधाऱ्याच्या आतून-वरून बरेच राजकीय पाणी वाहून गेलं, पाच वर्षांपूर्वी अप्पासाहेब पाटलांनी बंदलगी बंधाऱ्याचा विषय उभा केला त्यावेळचे त्यांचे नेते दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, या आंदोलनाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, शिवशरण पाटील अशा सुभाष बापू विरोधकांनी हा विषय उचलून धरला,
बापू सुद्धा बंधाऱ्यावर जाऊन आले, शेवटी बंधारा दुरुस्त करण्याचे ठरले, काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली होती, नंतर अप्पू पाटील बापूंच्या नेतृत्वाखाली गेले, कंदलगाव गटातून बाजार समिती संचालक झाले, पुढे त्यांनी बंदलगी मध्ये डोकं घालणं बंद केलं, नंतर तो विषय तसाच राहिला, विधानसभा निवडणुकीत हाच विषय बापूंना अडचणीचा ठरला नदी पट्ट्यातील लोकांनी स्वीकारले नाही, बापूंनी परत त्यात लक्ष घालणेच बंद केले, तेव्हापासून बंदलगी बंधारा आपल्या दुरुस्तीची वाट बघतो आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात आपला जम बसवत चाललेले नेते बाळासाहेब बंडगर उर्फ बंडगर मामानी आता या विषयात लक्ष घातले आहे बुधवारी बंडगर मामा हे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राजूर,औराद, बोळकवठा आदी भागात होते, त्यांना या तालुक्यात धनगर समाजासह लिंगायत, बौद्ध, मुस्लिम समाजातील युवा फळीची सोबत वाढत चालली आहे, बुधवारी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बंदलगी बंधाऱ्याला मामांनी भेट दिली या भेटीत त्यांच्यासोबत भागवत जोगदनकर, बोळकवठा सरपंच रफिक नदाफ, अरविंद भंडारे आमसिद्ध बुळगुंडे, पद्मण्णा वडरे, भारत बनसोडे, संजवाडचे माजी सरपंच पंडित बुळगुंडे, राजूरचे उपसरपंच सतीश देवकते,तुकाराम मुळेवाडी, इंद्रजीत लांडगे, शिवानंद पुजारी, जोत्यप्पा सिनेवडियार, बापूराव हालोळ्ळी, श्रीकृष्ण हालोळ्ळी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या बंधारासंदर्भात पाठपुरावा करून लवकरच बैठक लावून हा विषय मार्गी लावण्याच आश्वासन बंडगर मामांनी दिलयं. जिल्ह्यात सध्या मामांची चलती आहे, मामा बोले अन् दादा चाले असे चित्र असून
बंदलगी बंधाऱ्याचे काम बंडगर मामांनी केले तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल यात शंका नाही.




















