दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना व उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धनाथ साखर कारखान्याने मागील सात महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले बिले नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापुर इथले शेतकरी अनिल पाटील यांनी चक्क फाटके कपडे घालून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. पोलिस प्रशासनाने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी आणले होते, दरम्यान अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांची अडचण सांगितली सात महिने झाले बिले दिली नाहीत शेतकऱ्यांनी खायचे काय आमच्या घामाचा पैसा आहे कष्टाचा पैसा आहे कोणाला भीक मागत नाही जर बिल नाही दिल्यास आषाढी वारीसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला पहा ते काय म्हणाले


















