सोलापूर | मिळालेल्या माहितीनुसार गोदुताई विडी घरकुल येथे तब्बल 10 दिवसानंतर मंगळवारी पाणी आले व पाण्याला दबाव कमी असल्याने व पुढचे दहा दिवस पाणी येत नाही या कारणांमुळे अ विभागातील घर क्रं : 345/1 येथे पाण्याची मोटार लावली, तेवढ्यात हा दहा वर्षांचा समर्थ जाताना मोटारीला धक्का बसला व त्याचा दुर्देवाने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा जवाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या परिसरातील नागरिकांना सतत पाणी येत नाही याची तक्रार करून सुध्दा येथील संस्था व व्यवस्थापक दुर्लक्ष असल्याने व पाण्यामुळे आमचा मुलगा गेला अशी तक्रार त्याचा आई वडिलांना केली आहे.





















