सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावी दरम्यानच्या 335 शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल सातशे च्या जवळपास गावे ही कोरोना मुक्त आहेत त्यामुळे ज्या ज्या गावात महिनाभरात जेथे कोरोना रुग्ण नाही अशा गावातील शाळा सुरू कराव्यात असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता याच्यावर विचार होऊन राज्य शासनाने राज्यातील इयत्ता आठवी ते बारावी दरम्यानच्या शाळा कोरोणाचे अटी व नियम घालून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील मागील एक महिन्यात एक ही कोरोना रुग्ण नाही अशा 335 शाळा सोमवार 12 जुलै पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कामकाजाचे कौतुक केले.


















