सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित शोषखड्डे अभियान, शिक्षक मुख्याध्यापकांसाठी निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा तसेच जिल्ह्यातील ग्रामसभांना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या मॅरेथॉन दौऱ्यात भेटी दिल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या टीमने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तसेच शाळांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थ शिक्षकांचा उत्साह वाढवला जिल्ह्यामध्ये दहा हजार शोष खड्डे अभियानाचा प्रारंभ करण्यात आला सोरेगाव व मंद्रुप येथे २ आॅक्टोबंर निमित्त महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
दिलीप स्वामी यांच्या टीमने उत्तर सोलापूर पंचायत समिती अंतर्गत सोरेगाव येथील स्वच्छ व सुंदर शाळेस भेट दिली. त्या नंतर सोरेगाव व मंद्रुप येथील लोकसेवा विद्यालयात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेत पाहणी केली. मंद्रुप येथील केंद्र अंतर्गत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. इंदिरा नगर येथील स्वच्छ व सुंदर असलेल्या प्राथमिक शाळेस भेट दिली. अस्थिव्यंग असलेले यशवंत कांबळे या मुख्याध्यपकांनी परिश्रम करून शाळेचे रूपडे पालटले आहे. या शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक कांबळे यांचा जागेवर जाऊन सिईओ स्वामी यांनी सत्कार केला.
या वेळा दक्षिण सोलापूरच्या पालक अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, उत्तर सोलापूर चे गटविकास अधिकारी डाॅ. प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटशिक्षणाधिकारी बनसोडे, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, मुख्याध्यापक रणजित गरड, केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापू जमादार, मंद्रुप चा सरपंच कलावती खंदारे , मुख्याध्यापक टेळे प्रमुख उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंती निमित्त मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित स्थायित्व व सुजलाम अभियान व स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षण २०२१ चा गाव स्तरावरील शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी सांडपाणी व्यवस्थापना साठी शोषखड्डेचा शुभारंभ करणेत आला. जिल्हयात १० हजार शौषखड्डे सुरू करणेत आले असलाते सिईओ स्वामी यांनी सांगितले.
माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत मंद्रुप मधील इंदिरा नगर शाळेत वृक्षरोपन करणेत आले. एक पद एक वृक्ष लागवड व सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामांची पाहणी सिईओ स्वामी यांनी केली. नवीन बांधलेल्या शौषखड्डयाची पाहणी केली.
कोरोना गेला नाही. शाळां सुरू झालेनंतर विद्यार्थ्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना साबणाने स्वच्छ हात धुणेची व्यवस्था करा. असे आवाहन सिईओ स्वामी यांनी केले. या प्रसंगी शिक्षक सतीश वाले व कविता दिवाणजी यांनी मनोगत व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. या निबंध स्पर्धा सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली. सोलापूर जिल्हयात प्राथमिक शिक्षकांसाठी ठेवणेत आलेल्या निबंध स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 6848 पैकी 6368 शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे. केंद्र स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते. असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी सांगितले.




















