सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे, विशेष करून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. हातातोंडाला आलेली पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात काढणीला आलेले सोयाबीन हे पीक तर अक्षरशा पाणी शेतामध्येच थांबून राहिल्याने सडून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांमधून पुढे आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती सर्कल भागात सध्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, तहसीलदार अमोल कुंभार यांनी पंचनामे करण्याच्या मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्या आहेत गावचा तलाठी, कोतवाल यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृषी पर्यवेक्षक, विस्ताराधिकारी व मंडलाधिकारी यांच्यावर आहे.
तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
केवळ ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र विचारात घेवून करावेत. पंचनाम्यासोबत झालेल्या नुकसानीचे Angel Cam Lite अथवा तत्सम App मधून घेणेत आलेले छायाचित्र संलग्नित करणेत यावे. २. करणेत आलेल्या पंचनाम्यास अनुसरून आपदग्रस्तांच्या नावांच्या यादया तयार करतेवेळी यादया तयार करतेवेळी यादयांमधील तपशिल (उदा. लाभार्थी शेतकरी यांचे नांव, बँकेचे नांव बँक खाते क्रमांक, परीगणीत केलेली रक्कम) अचूक असल्याची खात्री करावी.
३. सदर प्रक्रियेअंतर्गत पंचनामे करणेची कार्यवाही पूर्ण झालेनंतर तयार झालेले अभिलेख संबंधित महसूल मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी जमा करणेत यावेत.
४. सदर विषयी करावयाच्या कार्यवाहीकरीता आवश्यक विहीत प्रपत्रे, शासन निर्णय सोबत संलग्नित करणेत आले आहेत.
५. करणेत आलेल्या पंचनाम्यास अनुसरुन आपदग्रस्तांच्या नावांच्या यादया तलाठी / ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी / कृषी सेवक / सहाय्यक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रमाणित करुन या कार्यालयात सादर करणेत याव्यात.


















