सोलापूर : भारती विद्यापीठा अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस सोलापूर येथे उद्योजकता विकास विभागा अंतर्गत नुकतेच ‘स्टाटअप नेव्हीगेटर’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यामधुन यशस्वी उद्योजक निर्माण व्हावे यासाठी उद्योजकता विकास विभागा अंतर्गत नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सेमिनार च्या सुरुवातीला समन्वयक प्रा. डॉ. गणराज माने यानी कार्यक्रमाचा हेतु विषद केला. संचालक डॉ. एस. बी सावंत यानी प्रमुख वक्ते अमित कामतकर यांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात प्रा. डॉ. एस. बी सावंत यांनी इन्स्टिटयुट तर्फे विद्यार्थ्याच्या सर्वागीन विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
अमित कामतकर यांनी आपल्या भाषणात यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य, नवीन उद्योग सुरू करताना येणारे अडथळे व ते अडथळे दुर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर आपले मत व्यक्त केले व नवीन उद्योग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्याना प्रेरित केले. अमित कामतकर यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे व्यवस्थापनाचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे सांगितले व महाराजाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगावरून आपण कुठले व्यवस्थापन कौशल्य शिकु शकतो याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.बी.ए प्रथम वर्षाची विद्यार्थीनी शृती कालगी यांनी केले, प्रमुख पाहुण्याची ओळख एम.बी.ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी अमेय कदम यांनी केली तर आभार प्रदर्शन एम.बी.ए प्रथम वर्षाची विद्यार्थीनी प्रज्ञा जगदाळे यांनी केले. यावेळी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी.पी. कोठारी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व एम. बी.ए तसेच बी.बी.ए चे विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम कोव्हीड १९ चे सर्व नियम काटेकोर पणे पाळुन पार पडला.

















