Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : मतिमंद बालकाला ठेवले जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलवर ; काय आहे प्रकार ; शंभरकरांची संवेदनशीलता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.16- ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधी मिळत नसल्याने बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील पालकांनी आपल्या चिमुरड्या मतिमंद बालकाला चक्क जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या टेबलवर ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवित तेथून निघून गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची व तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची एकच धांदल उडाली.

गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर हेही यावेळी कार्यालयात उपस्थित नव्हते. हा प्रकार लक्षात येताच बंदोबस्तासाठी असलेले सदर बझार पोलीस ठाण्याचे हवालदार अजित देशमुख व अरुणकुमार फडके यांनी निघून गेलेल्या पालकांचा तातडीने शोध घेऊन त्यांना परत जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शंभरकर यांनीही संवेदनशीलता दाखवून तत्काळ कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनाही बोलावले. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या पालकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिखर्डे (ता.बार्शी) येथील रामचंद्र दत्तात्रय कुरळे यांना दोन अपत्ये आहेत. यात मोठ्या मुलीचे नाव वैष्णवी (वय 11) तर लहान मुलाचे नाव संभव (वय 8) असे आहे. दुर्दैवाने दोन्ही मुले शंभर टक्के मतिमंद आहेत. मतिमंद व दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतीकडून पाच टक्के निधी खर्च करण्यात येतो. परंतु चिखर्डे ग्रामपंचायतीने या पाच टक्के निधीचा लाभ संभवला दिला नाही. ग्रामसेवकाने निधी देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मतिमंद बालकाच्या पालकांची मागणी होती. याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपर्यंत तक्रारी दिल्या. परंतु निद्रावस्थेत असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे वैतागून गुरूवारी संभव या मतिमंद बालकासह त्याचे पालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या मतिमंद बालकाला चक्क जिल्हाधिकार्‍यांच्या टेबलवर ठेवून निषेध नोंदविला. यावेळी राजकीय पक्षाचे काही कार्यकर्तेही त्यांच्यासमवेत होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई तर कराच शिवाय मतिमंद बालकाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश तेथे उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांना दिले. तसेच मतिमंद बालकाच्या पालकांनाही त्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालक आपल्या बालकाला घेऊन जिल्हाधिकारी कक्षाबाहेर आले. त्यांचे समाधान झाले असे समजून जिल्हाधिकारी निघून गेले. त्यानंतरही मतिमंद बालकाचे पालक आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्यात उशिरापर्यंत चर्चेच्या फेर्‍या सुरूच होत्या. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पालकांना भडकावत असल्याचा आरोप जि.प.च्या अधिकार्‍यांनी केल्यानंतर  काही वेळ वादावादीही झाली. परंतु तोडगा निघत नव्हता. पोलिसांनीही मध्यस्थी केली. पालक ग्रामसेवकाच्या निलंबन कारवाईवर ठाम होते. शेवटी शेळकंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पालकांनी माघार घेतली आणि मतिमंद बालकाला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सोडले.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : आमदार प्रणिती शिंदेंना पक्षाकडून मोठी संधी ; या पदावर नियुक्ती

Next Post

सोलापूर | दोन ‘अण्णां’च्या हस्ते कर्नाटकच्या अशोक गुत्तेदारांचा सत्कार ; सत्काराने साहेब भारावले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर | दोन 'अण्णां'च्या हस्ते कर्नाटकच्या अशोक गुत्तेदारांचा सत्कार ; सत्काराने साहेब भारावले

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979109
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group