सोलापूर (प्रतिनिधी) भारतीय रेल्वेकडून दोन वर्षापूर्वी देशातील सर्व विभागातील स्थानकांना विज बचतीचे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर सोलापूर रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प सुरू केल्यास विजेवर होणारा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. त्यामुळेच सोलापूर रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवावा, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
सोलापूर रेल्वे स्थानक हे भारतातील वर्दळीच्या रेल्वे स्थानकापैकी एक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथे आहे. सोलापूर रेल्वे स्थानक हे बेंगलोर, हैदराबाद व दक्षिण भारताला जोडणारे मुख्य स्थानक आहे. विज बचतीसाठी भारत देशातील अनेक रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे. भारतीय रेल्वेकडून दोन वर्षापूर्वी देशातील सर्व विभागातील स्थानकांना विज बचतीचे आवाहन केले आहे.
त्याच धर्तीवर सोलापूर रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जेवर चालणारा प्रकल्प सुरू करावा. त्यामुळे विजेवर होणारा लाखो रूपयांचा खर्च वाचणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर विजेचा वापर अधिक असून या स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केल्यास या साऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. तरी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवावा, असे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटले आहे.
















