Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : पोलीस अधीक्षक व न्यायदंडाधिकारी नावाने बनवले ‘फेक फेसबुक’ अकाउंट ; असे उकळले पैसे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे फेसबुक फेक अकाउन्ट तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून पैशांची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना ‘फोन पे / गुगल पे’चे नंबर देवून सदर मोबाईल नंबरवर पैसे मागवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. यागुन्ह्यात सायबर क्राईम विभागाने उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यातून दोघांना अटक केली.

मोनुकुमार नथुसिंग पाल, वय २६ वर्षे, रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तरप्रदेश व  देवकरण हनुमानसिंग रावत, वय २४ वर्षे रा. फारकिया, ता. नसिराबाद जि. अजमेर, राज्य राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

जानेवारी 2021 मध्ये सोलापूर जिल्हयातील एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फेसबुक फेक अकाउन्ट तयार करून त्यांचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना friend request पाठवून पैशांची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना फोन पे / गुगल पे चे नंबर देवून सदर मोबाईल नंबरवर पैसे पाठविण्याबाबत सांगितले. त्यातील दोन व्यक्तींनी अनुक्रमे 10,000 रूपये व 7,000 रुपये रक्कम संबंधीत मोबाईल नंबर वर रजिस्टर असलेल्या फोन पे व गुगल पे अकाउन्टवर पैसे पाठवून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच आक्टोंबर 2021 मध्ये  पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे फेसबुक वरील प्रोफाईलची माहिती काॅपी करून त्याचसारखे बनावट फेसबुक अकाउन्ट तयार केले आणि त्यांच्या जवळचे मित्र, नातेवाईक व ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची तात्काळ गरज असल्याचे भासवून त्यांना मोबाईल नंबर दिला त्यावर रजिस्टर असलेल्या फोन पे / गुगल पे अकाउन्टवर पैसे पाठविण्याबाबत सांगितल्याचे उघड झाले. 

अज्ञात इसमाविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे ही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर दोन्ही गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे, प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आलेला होता.  दोन्ही गुन्हयांचा तांत्रिक तपास व विश्लेषण करून या गुन्हयातील आरोपींची माहिती निष्पन्न करून  दोन तपास पथके तयार करून त्यांना या गुन्हयाबाबत माहिती सांगून त्यांना उत्तरप्रदेश, व राजस्थान या ठिकाणी रवाना करण्यात आले.

या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती काढून दोन्ही गुन्हयातील 1-1 असे एकूण 02 आरोपीतांना गुन्हा करण्याकरीता वापरलेले मोबाईल फोन तपासकामी जप्त करून त्यांना जेरबंद करण्यात आले. या दोन्ही गुन्हयातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्षनाखाली, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक  श्रीकांत पाडूळे, स्थानिक गुन्हे षाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, यांचे नेतृत्वाखाली सपोनि शशिकांत शेळके, पोसई गणेश पिंगुवाले, शैलेश खेडकर, सुरज निंबाळकर, पोलीस अंमलदार मनोज भंडारी, मोहन मनसावाले,दत्ता खरात, विशाल टिंगरे,सचिन मसलखांब, सचिन दरदरे, अन्वर अत्तार, अर्जून केवळे यांनी केली आहे.

पोलीस प्रशासनाने केले हे आवाहन

मागील काही महिन्यांपासून फेसबुक वरील प्रोफाईल ची काॅपी करून फेक प्रोफाईल बनवून सदरची व्यक्ती ही तिच आहे असे भासवून वेगवेगळया अडचणी असल्याचे कारणे सांगून तात्काळ पैशाची आवश्यकता असल्याचे भासवून ‘फोन पे व्दारे / गुगल पे’ या सारख्या ऑनलाईन अँपव्दारे पैशाची मागणी करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झालेली आहे. सामान्यतः समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी इत्यादी व्यक्तींचे मुख्यतः फेक प्रोफाईल बनवून फसवणूकदार पैशांची मागणी करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. 

या घटनेचे गांभीर्य ओळखून व अशा प्रकारच्या वाढत असलेल्या घटना यांना प्रतिबंध होणेकरीता लोकांमध्ये सायबर जागरूक्ता असणे आवश्यक आहे. 

⭕फेसबुक प्रोफाईल ची माहिती व प्रोफाईल फोटो लाॅक करणे आवश्यक आहे.

⭕फेसबुक प्रोफाईल मधील Friend List  कोणालाही दिसणार नाही याकरीता Who can see your friend list  यामध्ये Onle me हे ऑप्शन सिलेक्ट करावा.

⭕बनावट फेसबुक अकाउन्टव्दारे कोणीही पैशाची मागणी करीत असल्यास संबंधीत व्यक्ती सोबत व्यवहार करण्यापूर्वी खात्री करणे आवश्यक आहे.

⭕बनावट फेसबुक अकाउन्ट तयार झाले असल्यास तात्काळ रिपोर्ट मध्ये Pretending to me हे ऑप्शन सिलेक्ट करून फेक अकाउन्ट तात्काळ बंद करावे.

⭕कोणत्याही अनोळखी व्यक्तीची Friend Request Accept करू नये.

⭕ कोणत्याही व्यक्तीला अपव्दारे / फोन व्दारे / एसएमएस व्दारे आपल्या बॅंक खात्याची / डेबिट / क्रेडिट कार्ड संबंधी गोपनीय माहिती देवू नये.

⭕ कोणत्याही कंपनी / सव्र्हिसेस यांची माहिती कस्टमर केअर नंबर इत्यादी गुगलवर सर्च करू नये. त्याकरीता संबंधीत कंपनी / सव्र्हिसेस च्याऑफिसिएल साईटवर जावून खात्री करूनच त्यांना संपर्क करण्यात यावा. तसेच अज्ञात व्यक्तींचा फोन आला असता कोणत्याही प्रकारी वैयक्तीक व बॅंकेसंदर्भातील माहिती देवू नये.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : तळे हिप्परगा मध्ये गुरुचरित्र पारायणाचा महाप्रसादाने समारोप

Next Post

आमदार सुभाष देशमुखांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही महत्वाची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार सुभाष देशमुखांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही महत्वाची मागणी

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986188
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group