मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बेंगरुळ येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर कन्नड गुंडानी शाई मारुन विटंबना केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.निषेध नोंदवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करत भारतीय जनता पार्टीला लक्ष केले, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये
मी दिवसभर वाट पाहिली कर्नाटक मध्ये ज्या पक्षाचे सरकार आहे. त्यांच्यातला एखादा तरी पुढारी बंगळुरू येथील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून झालेल्या विटंबनेबद्दल निषेध करेल तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली त्याबाबतीत काही बोलतील…..पण नेभळटांकडून ते ही झाले नाही…

















